“शरद पवार हे वैचारिक व्हायरस”, गुणरत्न सदावर्ते यांची पुन्हा जीभ घसरली!
वकील गुणरत्न सदावर्ते यांनी एसटी कष्टकरी जनसंघ सदावर्ते पॅनेल कार्यक्रमात बोलताना पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप चालू झाल्यानंतर शरद पवार हे जसे कष्टकऱ्यांच्या घरी गेले नाहीत, त्याच प्रमाणे त्यांनी कधी सर्वसामान्यांनाही कधी समजून घेतले नाही.
सातारा : वकील गुणरत्न सदावर्ते यांनी एसटी कष्टकरी जनसंघ सदावर्ते पॅनेल कार्यक्रमात बोलताना पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. “राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप चालू झाल्यानंतर शरद पवार हे जसे कष्टकऱ्यांच्या घरी गेले नाहीत, त्याच प्रमाणे त्यांनी कधी सर्वसामान्यांनाही कधी समजून घेतले नाही.पवारांच्यामुळे राज्यातील 124 एसटी कर्मचारी गतप्राण झाले”, असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी त्यांच्यावर केला आहे.”तसेच शरद पवार वैचारिक वायरस आहे ते वैचारिक वायरस निर्जंतुकीकरण आणि या व्हायरस चा स्प्रेड होऊ नये म्हणवून वैचारिक गोष्ट देण्यासाठीची ही आमची सभा वेगवेगळ्या ठिकाणी राज्यात करत आहोत”, असंही सदावर्ते म्हणाले.
Published on: Jun 15, 2023 11:18 AM
Latest Videos