एच 3 एन 2 इन्फ्लुएन्झा महाराष्ट्रातील पहिला बळी ‘या’ शहरात; खबरदारी घेण्याचं सरकारचं आवहन
H3N2 Influenza : एच 3 एन 2 इन्फ्लुएन्झाचा महाराष्ट्रातील पहिला तर देशातील तिसरा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे खबरदारी घेण्याचं आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आलं आहे. पाहा...
अहमदनगर : एन 3 एन 2 इन्फ्लुएन्झाचा महाराष्ट्रातील पहिला तर देशातील तिसरा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. अहमदनगरमध्ये हा पहिला बळी गेलेला आहे. एमबीबीएसचे शिक्षण घेणार्या 23 वर्षीय तरूणाचा अहमदनगरमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर 9 जणांचे नमुने लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. हा मृत तरूण औरंगाबाद जिल्ह्यातील रहिवासी आहे. वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी तो अहमदनगरमध्ये राहत होता. मागील आठवड्यात तो ट्रीपसाठी कोकणात गेला होता. ट्रीपवरून आल्यानंतर तो आजारी पडला. त्याची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली. त्यानंतर त्याला खासगी रुग्णालयात रविवारी उपचारासाठी दाखल करण्यात आला. तिथे तपासणी केल्यानंतर त्याला कोरोना सोबतचएन 3 एन 2 इन्फ्लुएन्झाची टेस्ट पॉझिटिव्ह आली. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे.
Published on: Mar 15, 2023 08:36 AM
Latest Videos