अवकाळीचा फटका, शेतकरी हवालदिल; संत्र्याचे दर कोसळले
नागपूरात गारपीट, अवकाळी पावसाच्या भितीने शेतकऱ्यांनी संत्रा काढून मार्केटमध्ये आणले आले. त्यामुळे कळमना मार्केटमध्ये आज संत्र्यांची विक्रमी आवक झाली. त्याचा थेट फटका हा दरावर झाला.
नागपूर : गारपीट, अवकाळी पावसामुळे राज्यातील अनेक ठिकाणी शेतीचे मोठं नुकसान झालं आहे. त्याचबरोबर त्याचा बागायतदार यांनाही फटका बसला आहे. गारपीट, अवकाळीमुळे केळी, द्राक्ष आणि संत्रा पिकाचे नुकसान झाले आहे. हवामान विभागाने पुन्हा एकदा अवकाळी वादळी पाऊस आणि गारपिटीचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे नुकसानीच्या भितीपोटी शेतकऱ्यांनी संत्रा काढून मार्केटला आणला. एकाच वेळी शेतकऱ्यांनी संत्रा बाजारात आणल्याने, कळमना मार्केटमध्ये संत्र्यांची मोठी आवक झाली आहे. याचा फटका शेतकऱ्यांना बसतोय. गेल्या दोन आठवड्यात नागपूरच्या कळमना मार्केटमध्ये संत्र्याचे निम्मे दर पडलेय. पूर्वी ६० रुपये किलोनं विकले जाणारी संत्री सध्या २५ ते ३० रुपये किलो विकली जात आहे.
Published on: Mar 16, 2023 12:43 PM
Latest Videos