Parbhani Rain Update | आठवडाभर परभणीत गारपीट आणि पावसाचा तडाखा सुरूच
परभणी शहरात दुपारी दोनच्या सुमारास जोरदार पावसासह काही प्रमाणावर गारपीट झाली. आठवडाभर परभणी जिल्ह्यात अनेक भागात गारपीट आणि पावसाचा जोर सुरूच आहे.
परभणी : राज्यात सुरू असणाऱ्या अवकाळी पावसासह गारपिटीचा फटका शेतकऱ्यांना बसताना दिसत आहे. तर परभणी शहरात दुपारी दोनच्या सुमारास जोरदार पावसासह काही प्रमाणावर गारपीट झाली. आठवडाभर परभणी जिल्ह्यात अनेक भागात गारपीट आणि पावसाचा जोर सुरूच आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. सतत होणाऱ्या पावसामुळे उन्हाळा की पावसाळा असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. अवकाळी पावसामुळं राज्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. तर सतत पडणाऱ्या पावसामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्याला बसत आहे.
Published on: May 01, 2023 09:24 AM
Latest Videos