हमाली करणाऱ्या एका मजुरांच्या मुलीची नीटच्या परीक्षेत यशाला गवसणी; मिळवले 720 पैकी 541 मार्क्स

हमाली करणाऱ्या एका मजुरांच्या मुलीची नीटच्या परीक्षेत यशाला गवसणी; मिळवले 720 पैकी 541 मार्क्स

| Updated on: Jun 20, 2023 | 12:05 PM

‘नीट’ परीक्षेत संपादन केलेल्या गुणांच्या आधारे वैद्यक अभ्यासक्रमातील प्रवेश निश्चित केले जातात. ही परीक्षा सर्वच राज्यामध्ये घेतली जाते. राज्यातही अनेक मुला मुलींनी यावर्षी ‘नीट’ परीक्षा दिली आणि यश संपादनही केलं आहे. त्यात अनेक विद्यार्थी हे परिस्थितीशी दोन हात करून संधीचे सोनं करण्याच्या दिशेने जात आहेत.

नांदेड : वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना नीट (NEET) प्रवेश परीक्षा देणे अनिवार्य आहे. ‘नीट’ परीक्षेत संपादन केलेल्या गुणांच्या आधारे वैद्यक अभ्यासक्रमातील प्रवेश निश्चित केले जातात. ही परीक्षा सर्वच राज्यामध्ये घेतली जाते. राज्यातही अनेक मुला मुलींनी यावर्षी ‘नीट’ परीक्षा दिली आणि यश संपादनही केलं आहे. त्यात अनेक विद्यार्थी हे परिस्थितीशी दोन हात करून संधीचे सोनं करण्याच्या दिशेने जात आहेत. नांदेडमध्येही अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत एका हमाली करणाऱ्या एका मजुरांच्या मुलीने नीटच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवलंय. नांदेडच्या नायगांव शहरात राहणाऱ्या हमाल माधव भालेराव यांच्या मुलीनं हे यश मिळवलं आहे. तर निकिता भालेराव असं तिचं नाव. तिनं कुठल्याही खाजगी क्लास किंवा मार्गदर्शनाशिवाय घरातच अभ्यास केला. तर नीटच्या परीक्षेत 541 मार्क्स मिळवले आहेत. ती एमबीबीएसच्या अभ्यासक्रमासाठी पात्र ठरल्याने मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुंबाचा आनंद गगनात मावेनासा झालाय. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत निकिताने मिळवलेल्या या यशाचे सर्वत्र कौतुक होतेय.

Published on: Jun 20, 2023 12:05 PM