Video :  तळोजा जेलबाहेर राणा दाम्पत्यांविरोधात शिवसैनिकांची घोषणाबाजी

Video : तळोजा जेलबाहेर राणा दाम्पत्यांविरोधात शिवसैनिकांची घोषणाबाजी

| Updated on: Apr 24, 2022 | 5:22 PM

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (navneet rana) आणि आमदार रवी राणा (ravi rana) यांना वांद्रे कोर्टाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. कोर्टाच्या निर्णयानंतर त्यांनी जामिनासाठी अर्ज केला. मात्र, त्यांना जामीन मिळू शकला नाही. त्यांना जामीन मिळाला नाही. त्यामुळे त्यांना 29 एप्रिलपर्यंत तुरुंगात राहावं लागणार आहे. कोर्टाच्या या निर्णयानंतर दोघांनाही पोलीस (police) कोर्टाच्या बाहेर घेऊन आले. दोघेही कोर्टाच्या बाहेर […]

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (navneet rana) आणि आमदार रवी राणा (ravi rana) यांना वांद्रे कोर्टाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. कोर्टाच्या निर्णयानंतर त्यांनी जामिनासाठी अर्ज केला. मात्र, त्यांना जामीन मिळू शकला नाही. त्यांना जामीन मिळाला नाही. त्यामुळे त्यांना 29 एप्रिलपर्यंत तुरुंगात राहावं लागणार आहे. कोर्टाच्या या निर्णयानंतर दोघांनाही पोलीस (police) कोर्टाच्या बाहेर घेऊन आले. दोघेही कोर्टाच्या बाहेर आले. तेव्हा दोघांचेही चेहरे पडले होते. दोघांच्याही चेहऱ्यावर तणाव दिसत होता. काल पोलीस ठाण्यात जाताना राणा दाम्पत्यांकडून मीडियाच्या दिशेने हात उंचावून जोरजोरात घोषणा दिल्या जात होत्या. पण आज नवनीत राणा यांचा चेहरा पडला होता. मात्र, मीडियाने आवाज देताच दोघांनीही हात जोडले आणि निघून गेले. त्यानंतर पोलिसांनी दोघांनाही दोन वेगवेगळ्या व्हॅनमध्ये बसवून तुरुंगाच्या दिशेने घेऊन गेले. तिथे आता शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करायला सुरूवात केली आहे.