शरद पवार आजच्या काळातील शाहू महाराज; कुणाचं वक्तव्य? पाहा…
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची थेट राजर्षी शाहू महाराज यांच्याशी तुलना करण्यात आली आहे. पाहा कुणी केलीय तुलना...
सासवड, पुणे: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची थेट राजर्षी शाहू महाराज यांच्याशी तुलना करण्यात आली आहे. शरद पवार हे आजच्या काळातील शाहू महाराज आहेत, असं म्हणत प्रा.हरी नरके यांनी शरद पवारांची तुलना थेट राजर्षी शाहू महाराज यांच्याशी केलीय. तर बाबा आढाव हे आजच्या काळातील महात्मा फुले आहेत, असंही हरी नरके म्हणालेत. सासवडमध्ये आयोजित सत्यशोधक समाज परिषदेत हरी नरके यांनी हे वक्तव्य केलंय. हरी नरकेंच्या या वक्तव्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
Published on: Feb 08, 2023 07:25 AM
Latest Videos