राज्यातील सत्तासंघाबाबत हरीश साळवे यांची मोठी मागणी; पाहा काय म्हणालेत...

राज्यातील सत्तासंघाबाबत हरीश साळवे यांची मोठी मागणी; पाहा काय म्हणालेत…

| Updated on: Mar 14, 2023 | 2:37 PM

सर्वोच्च न्यायालयात सध्या राज्यातील सत्ता संघर्षावर सुनावणी होत आहे. यावेळी अॅड. हरीश साळवे यांनी मोठी मागणी केली आहे. विधानसभा अध्यक्षांचा मुद्दा त्यांनी अधोरेखित केला आहे. ते काय म्हणालेत? पाहा...

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयात सध्या राज्यातील सत्ता संघर्षावर सुनावणी होत आहे. यावेळी अॅड. हरीश साळवे यांनी मोठी मागणी केली आहे. विधानसभा अध्यक्षांकडेच हे प्रकरण पुन्हा सोपवावं, असं हरीश साळवे साळवे म्हणाले आहेत. उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा राज्यपालांना स्वीकारावा लागला. उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर शिंदेंनी बहुमत सिद्ध केलं. बहुमत बळाच्या जोरावर झालं, असं कसं म्हणता येईल? जोपर्यंत अपात्र होत नाहीत, तोपर्यंत आमदार काम करू शकतात. विधानसभा अध्यक्ष हे घटनात्मक पद आहे. ते 10 व्या शेड्यूल अंतर्गत येत नाही. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांकडेच हे प्रकरण पुन्हा सोपवण्यात यावं, असं हरीश साळवे म्हणाले आहेत. अविश्वास असेल तर बहुमत चाचणी होते. त्यात गैर काय? बहुमत चाचणी बोलावून राज्यपालांनी काहीही चूक केलेलं नाही, असंही हरीश साळवे म्हणाले आहेत.