कोल्हापुरातील घटनेवर हसन मुश्रीफ यांची प्रतिक्रिया; म्हणाले, “दोषींवर कारवाई झालीच पाहिजे”
कोल्हापुरात काही लोकांनी आक्षेपार्ह स्टेटस फोनवर ठेवले होते. तसंच दोन दिवसांपूर्वी अहमदनगर या ठिकाणी दोन दिवसांपूर्वी निघालेल्या संदलमध्ये औरंगजेबाचे फोटो नाचवले गेले. त्याच पार्श्वभूमीवर कोल्हापुरातल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आलं.
कोल्हापूर : कोल्हापुरात काही लोकांनी आक्षेपार्ह स्टेटस फोनवर ठेवले होते. तसंच दोन दिवसांपूर्वी अहमदनगर या ठिकाणी दोन दिवसांपूर्वी निघालेल्या संदलमध्ये औरंगजेबाचे फोटो नाचवले गेले. त्याच पार्श्वभूमीवर कोल्हापुरातल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आलं. या मोर्चात जमाव मोठ्या प्रमाणावर जमला होता. पोलिसांनी या ठिकाणी धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. त्याआधी पोलिसांसह धक्काबुक्कीचे काही प्रकार झाले. त्यामुळे आंदोलकांवर सौम्य लाठीचार्जही करण्यात आला आहे. यासंपूर्ण घटनेमुळे राज्यातील राजकारणात खळबळ माजली आहे. कोल्हापुराती या तणावपुर्वक परिस्थितीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “ही भूमी छत्रपती शाहू महारांजी भूमी आहे, माझी कोल्हापुरकरांना विनंती आहे की, त्यांनी शांतता राखावी. ज्यांनी हे फोटो स्टेटसला ठेवले त्यांच्यावर कडक कारवाई केली पाहिजे”, असं हसन मुश्रीफ म्हणाले.