हसन मुश्रीफ यांचा किरीट सोमैय्यांना सल्ला, कोल्हापुरात यायचं तर या पण…
माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कागल येथील घरी ईडी आणि आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांच्या धाडीनंतर त्यांनी आता भाजप नेते किरीट सोमय्या यांना एक सल्ला दिलाय.
कोल्हापूर : राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ ( HASAN MUSHRIF ) यांच्यासह त्यांच्या निकटवर्तीयांच्या घरावर दोन दिवसांपूर्वी ईडी आणि आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकली होती. त्यानंतर भाजप नेते किरीट सोमैया ( KIRIT SOMAIYA ) यांनी कोल्हापूरमध्ये ( KOLHAPUR ) जाण्याची घोषणा केली होती. त्यावरून हसन मुश्रीफ यांनी त्यांना सल्ला दिलाय.
माझ्या घरावर तीन वेळा छापा टाकण्यात आला. त्यावेळी काही मिळाले नाही. आताही छापा पडणार याची माहिती चार दिवस आधीच मिळाली होती. छापा टाकणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांचा काही दोष नाही. या मागे कोण? यात जाऊन कुणाला डिवचून काही वाद करायचा नाही असे ते म्हणाले.
सोमय्या कोल्हापुरात येणार आहेत. त्यांना कार्यकर्ते अडवणार नाहीत. कोल्हापुरात येऊन त्यांनी कामाची माहिती घ्यावी. माझे काम हे खुली ‘किताब’ आहे. त्यांनी जरूर कोल्हापुरात यावं आणि दर्शन घेऊन जावं, असा सल्लाही मुश्रीफ यांनी सोमैयांना दिला.