मनसे नेता म्हणाला सबका हिसाब होगा, यासह काय पहाल 9 वाजताच्या 4 मिनिटात 24 हेडलाईन्समध्ये…
13 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजताच्या 4 मिनिटात 24 हेडलाईन्समध्ये बघा राजकीय घडामोडींचा वेध
ईडीच्या धाडसत्रानंतर हसन मुश्रीफ पहिल्यांदाच कोल्हापूरात दाखल होणार असून यावेळी त्यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले आहे. दरम्यान या पत्रकार परिषदेत ते काय बोलणार याकडे साऱ्यांचे लक्ष आहे.
मुंबई महापालिकेच्या उच्च पदस्थ अधिकाऱ्यांना ईडीची नोटीस, किरीट सोमय्यांनी यांनी असा दावा केला तर कोरोना काळातील निविदा प्रक्रियेत भ्रष्टाचार झाल्याचाही आरोप त्यांनी केला.
कॅगमधून स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना ईडीची नोटीस मिळाल्यानंतर सबका हिसाब होगा, असे म्हणत मनसे नेता संदीप देशपांडे यांनी अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. यासह अधिक बातम्या जाणून घ्या, ४ मिनिट २४ हेडलाईन्समध्ये
Published on: Jan 13, 2023 09:40 AM