VIDEO |‘आमचा निर्णय पक्षाच्या विस्तारासाठी’; मुश्रीफ यांनी सांगितलं शरद पवार यांची सोथ सोडण्याचं कारण
राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यापासून आता शरद पवार हे पक्षाच्या बांधणीसाठी पुन्हा एकदा पायाला भिंगरी बांधून निघाले आहेत. त्यांनी राज्याचा दौरा करताना, नाशिक, बीडनंतर कोल्हापुरमध्ये जंगी निर्धार सभा घेतली. त्यावेळी त्यांनी अजित पवार गटासह मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर टीका केली.
कोल्हापूर : 26 ऑगस्ट 2023 | काल राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची कोल्हापूर येथे निर्धार सभा पार पडली. यावेळी त्यांनी अजित पवार गटावर जोरदार निशाना साधला. त्याचबरोबर त्यांनी कोल्हापूर जिल्ह्याचे नेते आणि अजित पवार गटाचे मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर टीका केली. त्यावेळी त्यांनी मुश्रीफ यांच्या घरातील महिलांनी हिंमत दाखवली मात्र पुरूषांनी नाही. ते गेले अशी टीका केली होती. त्यावरून हसन मुश्रीफ यांनी आज आपली प्रतिक्रिया दिली.
यावेळी त्यांनी, पवार यांचे काही संदर्भ सांगत २०१४ साली काय झालं होते. आणि तेव्हा शरद पवार यांनी कोणती भूमिका घेतली होती ते सांगितलं. तर त्यांनी, भाजप आणि शिवसेना हे हिंदुत्ववादी पक्ष आहेत. जरी शिवसेना ठाकरे गट हा महाविकाय आघाडीत असलातरीही त्यांनी हिंदुत्व सोडलेला नाही. त्यांचे कठोर हिंदुत्व असणारी वक्तव्य वेळोवेळी येत आहेत. तर भाजप आणि शिनसेना यांची वैचारिक बांधणी एकच आहे. तरिदेखील आम्ही ठाकरे यांच्या शिवसेने सोबत अडिच वर्ष होतो. त्यांच्याबरोबर जुळवून घेतलं.
मात्र त्यांना त्यांचेच लोक जपता आले नाहीत. त्यामुळेच सत्ता गेली. तर पाचवेळी भाजपसोबत बोलणी केली होती. आता एक हिंदुत्वादी पक्ष सोडला आता दुसऱ्यासोबत आम्ही जात आहे. पक्षाच्या विस्तारासाठी हा सामूहिक निर्णय घेतला आहे. याबाबत चर्चा आमच्या दैवताबरोबर (शरद पवार) झाल्या होत्या असा दावा देखील त्यांनी केलाय.

'मोदींना पवार यांच्या बाजूला कसे..., ' काय म्हणाले संजय राऊत

तुळजा भवानी मातेच्या मूर्तीची जागा हलविणार ? काय आहेत घडामोडी

धनंजय मुंडेंना कोण वाचवतंय? अंजली दमानिया यांचा थेट आरोप काय?

राज ठाकरे-उदय सामंतांच्या भेटीने भुवया उंचावल्या, मनसे नेते म्हणाले..
