maharashtra politics : राष्ट्रवादीला सुरुंग! अजित पवार यांच्याबरोबर मुश्रीफ यांनी घेतली शपथ; पालकमंत्री होण्याची शक्यता
तर त्यांनीही आपण नाराज नसून मरेपर्यंत राष्ट्रवादीतच राहणार असं म्हटलं होतं. तर त्यांच्याच प्रमाणे हसन मुश्रीफ यांनी देखील म्हटलं होतं. मात्र आज झालेल्या राजकीय भूकंपात त्यांनी अजित पवार यांना साथ देत ते देखील भाजप सरकारमध्ये सामिल झाले आहे.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे नाराज असल्याच्या अनेक दिवसांपासून बातम्या येत होत्या. तर त्यांनीही आपण नाराज नसून मरेपर्यंत राष्ट्रवादीतच राहणार असं म्हटलं होतं. तर त्यांच्याच प्रमाणे हसन मुश्रीफ यांनी देखील म्हटलं होतं. मात्र आज झालेल्या राजकीय भूकंपात त्यांनी अजित पवार यांना साथ देत ते देखील भाजप सरकारमध्ये सामिल झाले आहे. त्यांना आता कोल्हापूर जिल्ह्याचं पालकमंत्री पद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र याच दरम्यान भाजपमध्ये सामिल होण्यासाठी केंद्रीय यंत्रणांकडून तपास यंत्रणांचा दुरूपयोग केला जात असल्याचे त्यांनी अनेक वेळा म्हटलं होतं. त्याच दरम्यान त्यांनी भाजप प्रणीत सरकारमध्ये प्रवेश केल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. तर ईडीच्या रडावर असणारे मुश्रीफ हे सरकारमध्ये सामिल होण्यामागे हेच कारण असल्याचे बोलले जात आहे.