धैर्यशील मानेंच्या बॅनरवर विकासकामांची माहिती देणारं QR कोड, पण स्कॅन केलं अन् उघडली भलतीच साइट

| Updated on: Mar 05, 2024 | 2:25 PM

मतदारसंघातील काही तरुणांनी लावलेल्या होर्डिंगवरील क्यू आर कोड स्कॅन केला, मात्र त्यानंतर वेगळीच ऑनलाइन साईट उघडत असल्याचे निदर्शनास आले. याचाच एक व्हिडीओ सध्या समोर आला आहे. ज्यामध्ये तरुणांनी हा कोड फेक असल्याचे म्हटले आहे.

Follow us on

कोल्हापूर, 5 मार्च 2024 : हातकणंगले लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार धैर्यशील माने यांनी आपण केलेल्या विकासकामांची माहिती देणारे होर्डिंग लावले आहेत. मात्र या होर्डिंगवर विकासकामांची माहिती तसेच निधीची माहिती जाणून घेण्यासाठी जो क्यूआर कोड देण्यात आला आहे. तो फेक असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे मतदारसंघात एकच चर्चांना उधाण आले आहे. मतदारसंघातील काही तरुणांनी लावलेल्या होर्डिंगवरील क्यू आर कोड स्कॅन केला, मात्र त्यानंतर वेगळीच ऑनलाइन साईट उघडत असल्याचे निदर्शनास आले. याचाच एक व्हिडीओ सध्या समोर आला आहे. ज्यामध्ये तरुणांनी हा कोड फेक असल्याचे म्हटले आहे. घडलेल्या प्रकारानंतर धैर्यशील माने यांना सोशल मीडियात ट्रोल केल जात आहे. मानेंच्या विकासकामांची माहिती देण्यासाठी बॅनरवर जो क्यू आर कोड लावण्यात आला आहे तो कोड स्कॅन केल्यानंतर बिटकॉइन आणि शेअर मार्केटचे संकेतस्थळ ओपन होत असल्याचे पाहायला मिळत आहे.