पावसाच्या सरी आणि धबधब्यातून उडणारे तुषार झेलण्यासाठी पर्यटकांची हाजराफॉलला पसंती
या झालेल्या पावसामुळे जिल्ह्यात अनेक नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. तर पडलेल्या पावसाळामुळे सालेकसा तालुक्यातील हाजराफॉल धबधबा हा प्रवाहित झाला आहे.
गोंदिया, 7 ऑगस्ट 2023 | गेल्या आठवड्यापासून गोंदिया जिल्ह्याच्या अनेक भागात चांगला पाऊस झाला आहे. या झालेल्या पावसामुळे जिल्ह्यात अनेक नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. तर पडलेल्या पावसाळामुळे सालेकसा तालुक्यातील हाजराफॉल धबधबा हा प्रवाहित झाला आहे. ज्यामुळे येथे पर्यटकांची गर्दी वाढत आहे. हा धबधबा गोंदिया जिल्ह्याच्या सालेकसा तालुक्यातील निसर्गरम्य भागात असलेला आहे. तर तो ब्रिटिशकालीन असून पडलेल्या पावसामुळे ओसांडून वाहत आहे. तो भरभरून कोसळत आहे. तर हे मनमोहक दृश्य पाहण्यासाठी पर्यटक या ठिकाणी गर्दी करीत आहे….Hazrafall Falls News
Published on: Aug 07, 2023 10:09 AM
Latest Videos