Headline | 1 PM | नितीन गडकरी चांगला माणूस पण चुकीच्या पक्षात : अशोक चव्हाण

| Updated on: May 31, 2021 | 1:27 PM

कोरोना काळातील कामगिरीमुळे गेल्या काही दिवसांमध्ये कौतुकाचा वर्षाव होत असलेले देशाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांची आता काँग्रेसकडूनही प्रशंसा करण्यात आली आहे. केंद्रातील भाजप सरकारची एकूणच कामगिरी उणेच असली तरी केंद्रीय मंत्रिमंडळातील रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी म्हणजे ‘ चुकीच्या पक्षातील चांगला आणि कार्यक्षम माणूस’ असे त्यांचे वर्णन करावे लागेल, असे मत काँग्रेसचे नेते व सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी केले.