4 Minutes 24 Headlines : ठाकरेंच्या नावाने शिमगा करून काही उपयोग होणार नाही, उद्धव ठाकरेंचा टोला
उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या शिवसेनेत असणाऱ्या नेत्यांवर तोफ डागली आहे
मुंबई : दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत उभी दरी पडत मुळ शिवसेना आणि शिंदेचा गट निर्माण झाला. त्याच शिंदे गटाला निवडणूक आयोगाने खरी शिवसेना असल्याचा निकाल दिला आणि आरोप प्रत्यारोपांच्या, टीकांच्या फैरी सुरू झाल्या. शिंदेच्या शिवसेनेकडून शाखा ही ताब्यात घेण्याच्या प्रयत्न झाला. यावरून ठाकरे गटाकडून विरोधासह टीका होत आहे. यादरम्यान उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या शिवसेनेत असणाऱ्या नेत्यांवर तोफ डागली आहे. तसेच या खोकेवाल्यांची लवकरच होळी होणार असल्याचे म्हटलं आहे. त्याचबरोबर ठाकरेंच्या नावाने शिमगा करून काही उपयोग होणार नाही असही त्यांनी सुनावलं आहे.
Published on: Mar 08, 2023 01:59 PM
Latest Videos