4 Minutes 24 Headlines | मोदींना आडवण्याची तुमची हिम्मत आहे का? शिंदेंचा ठाकरेंना सवाल
उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपवर निशाना साधला. त्यांनी, शक्तिशाली हिंदू नेता पंतप्रधानपदी असतानाही हिंदूंना आक्रोश करावा लागतो, आम्हाला तळवे चाटले म्हणता, तर मग मिंध्येबरोबर सत्ता स्थापनेसाठी तुम्ही काय चाटलं असा सवाल केला
4 मिनिट 24 हेडलाईन्स | छत्रपती संभाजीनगर येथील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर महाविकास आघाडीची पहिली वज्रमूठ जाहीर सभा पार पडली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपवर निशाना साधला. त्यांनी, शक्तिशाली हिंदू नेता पंतप्रधानपदी असतानाही हिंदूंना आक्रोश करावा लागतो, आम्हाला तळवे चाटले म्हणता, तर मग मिंध्येबरोबर सत्ता स्थापनेसाठी तुम्ही काय चाटलं असा सवाल केला. उद्धव ठाकरे यांच्या टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पलटवार केला. त्यांनी मोदींना आडवण्याची तुमची हिम्मत आहे का? पालघर साधू हत्याकांडावेळी हिंदुत्व कुठं गेलं होतं अस म्हणत हल्ला केला आहे. तर शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी ठाकरे यांच्या टीकेला उत्तर दिले आहे. त्यांनी, तुम्ही फक्त वडिलांच्या जीवावर जगताय. माझं बोलनं टोचत असेल तर अंधारे यांचा सन्मान करा असा टोला लगावला आहे. यासह राज्यातील इतर घडामोडी पहा 4 मिनिट 24 हेडलाईन्समध्ये