4 Minutes 24 Headlines | शिंदे फक्त मुखवटा, राज्य फडणवीस चालवतात

4 Minutes 24 Headlines | शिंदे फक्त मुखवटा, राज्य फडणवीस चालवतात

| Updated on: Mar 29, 2023 | 8:41 AM

शिंदे फक्त मुखवटा आहेत, राज्य फडणवीस चालवतात अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे

4 मिनिट 24 हेडलाईन्स | मी यापूर्वीच डॉक्टर झालो आहे. छोटे-मोठे ऑपरेशन करत असतो, असे डॉक्टर पदवी मिळाल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलं आहे. तर शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी खोक्यावरून दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावरून न्यायालयाने उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांना समन्स बजावला आहे. यावरून खासदार संजय राऊत यांनी शेवाळे यांच्यावर पलटवार करताना ही आमची घोषणा नसून ती महाराष्ट्रातील जनतेची आहे. मग जनतेला समन्स पाठवणार का असा सवाल केला आहे. शिंदे फक्त मुखवटा आहेत, राज्य फडणवीस चालवतात अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे. तर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी शऱद पवार यांच्यावर केलेली टीका भोवणार असे दिसत आहे. पवार नावाची कीड महाराष्ट्राला लागली या वक्तव्यानंतर रमाबाई आंबेडकर पोलीस ठाण्यामध्ये त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Published on: Mar 29, 2023 08:41 AM