4 Minutes 24 Headlines | छाप्यावर सायरा मुश्रीफ म्हणाल्या, आम्हाला गोळ्या घालून जा

4 Minutes 24 Headlines | छाप्यावर सायरा मुश्रीफ म्हणाल्या, आम्हाला गोळ्या घालून जा

| Updated on: Mar 11, 2023 | 12:33 PM

न्हा एकदा उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांवर निशाणा साधला. मुलुंडचा पोपटलाल कारवाईवर आधीच कसा बोंबलतो?

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते, माजी मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांच्या घरावर आज पुन्हा एकदा ईडीची धाड पडली आहे. मागच्या दीड महिन्यात दुसऱ्यांदा ही कारवाई करण्यात आली आहे. आज पहाटेच्या सुमारास ईडीचे चार ते पाच अधिकारी हसन मुश्रीफ यांच्या घरी दाखल झाले. त्यानंतर मुश्रीफ यांच्या घरी आता चौकशी केली जात आहे. त्यानंतर त्यांच्या घरासमोर कार्यकर्त्यांची गर्दी जमली आहे. यावेळी समर्थकांनी भाजप सरकार विरोधात घोषणा दिल्या. या पडलेल्या छाप्यानंतर आम्हाला गोळ्या घालून जा असं हसन मुश्रीफ यांच्या पत्नी सायरा मुश्रीफ यांनी म्हणत अश्रूंना वाट मोकळी करून दिलीय. पुन्हा एकदा उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांवर निशाणा साधला. मुलुंडचा पोपटलाल कारवाईवर आधीच कसा बोंबलतो? 2024 नंतर जनताच अशा लफंग्यांना रस्त्यावर मारेल असा घनाघात संजय राऊत यांनी केला आहे. यासह इतर बातम्यांचा घ्या अपडेट

Published on: Mar 11, 2023 12:33 PM