4 Minutes 24 Headlines | फडणवीस यांच्यावर परत बोलाल तर फिरू देणार नाही : बावनकुळेंचा ठाकरेंना इशारा
फडणवीस यांच्यावर उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उत्तर देताना इशारा दिला आहे. आपण ठाकरे यांना शेवटची संधी देत आहोत
4 Minutes 24 Headlines | ठाण्यात ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्याला मारहाण प्रकरणी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस हे फडतूस गृहमंत्री असून त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणीही केली. त्यांच्या या टीकेला फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिली आहे. तर आपण फडतून नाही तर काडतुस आहोत. घुसेगा साला असं त्यांनी म्हटलं आहे. फडणवीस यांच्यावर उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उत्तर देताना इशारा दिला आहे. आपण ठाकरे यांना शेवटची संधी देत आहोत. फडणवीस यांच्यावर परत बोलाल तर फिरू देणार नाही असं ते म्हणाले. तर बावनकुळे यांना टोला लगावत उद्धव ठाकरे गटाच्या उपनेते सुषमा अंधारे यांनी, तुमची ताकद आणि कुवत तिकीट मिळवण्यासाठी वापरा असे म्हटलं आहे. तर फडणवीस हे तुम्हालाच संपवायला निघालेत असेही त्या म्हणाल्या. जिच्यावर हल्ला झाला, मारहाण झाली तिच्यावरच गुन्हा दाखल, हा ठाण्यात भाजप अजब कारभार असे म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी शिंदेंवर टीका केली आहे.