4 Minutes 24 Headlines | राऊत यांना लॉरेन्स बिष्णोई गँगकडून जीवे मारण्याची धमकी
छत्रपती संभाजीनगरमध्ये होणाऱ्या महाविकास आघाडीच्या सभेला पोलिसांनी मंजूरी दिली असून ती होणार आहे. तर सभा घेण्यावर मविआ नेते ठाम असल्याचे खासदार राऊत यांनी सांगितलं आहे
4 Minutes 24 Headlines : राज्याच्या राजकारणात उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे नाव सध्या खूप चर्चेत आहे. राऊत यांना लॉरेन्स बिष्णोई गँगकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे. यासंदर्भात संजय राऊतांनी पोलिसांना माहिती दिली असून पोलिसांनी त्यासंदर्भात तपास सुरू केला आहे. तर काही जनांना पोलिसंनी ताब्यात घेतलं आहे. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये होणाऱ्या महाविकास आघाडीच्या सभेला पोलिसांनी मंजूरी दिली असून ती होणार आहे. तर सभा घेण्यावर मविआ नेते ठाम असल्याचे खासदार राऊत यांनी सांगितलं आहे. तर सभे स्थळी मविआच्या नेत्यांनी भेट देत पाहणी केली जाणार आहे. सुभाष देसाई, सुनील प्रभू आणि अनिल देसाई आढावा घेणार आहेत. तर ही सभा निर्विघ्नपणे पार पडावी म्हणून येथील खडकेश्वर मंदिरात ठाकरे गटाकडून आरती करण्यात आली आहे.