उद्या सकाळी 11 पर्यंत ऋतुजा लटकेंचा राजीनामा स्विकारावा- न्यायालयाचा आदेश, यासह पहा फटाफट 4 मिनिट 24 हेडलाईन्स

उद्या सकाळी 11 पर्यंत ऋतुजा लटकेंचा राजीनामा स्विकारावा- न्यायालयाचा आदेश, यासह पहा फटाफट 4 मिनिट 24 हेडलाईन्स

| Updated on: Oct 13, 2022 | 5:35 PM

प्रत्येक वेळी आम्हाला कोर्टात जावं लागतं. हिम्मत असेल तर मैदानात या असे आवाहन शिंदे गटाला उद्धव ठाकरे यांनी आज दिलं.

होऊ घातलेल्या अंधेरी पोटनिवडणुकीवरून शिंदे गट आणि ठाकरे गटासह भाजपमध्ये चांगलीच चुसर पहायला मिळत होती. तर ठाकरे यांच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून ऋतुजा लटके यांचे नाव घोषित केलं होत. मात्र त्यांचा राजीनामा हा मुंबई महापालिकेच्या आयुक्तांनी स्विकारला नव्हता. त्याविरोधात ठाकरे गट उच्च न्यायालयात गेला होता. त्याच्यावर आज सुनावणी झाली. तर उद्या सकाळी 11 पर्यंत ऋतुजा लटके यांचा राजीनामा स्विकारावा असा आदेश न्यायालयाने दिला आहे. तर प्रत्येक वेळी आम्हाला कोर्टात जावं लागतं. हिम्मत असेल तर मैदानात या असे आवाहन शिंदे गटाला उद्धव ठाकरे यांनी आज दिलं. यादरम्यान विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी देखिल ऋतुजा लटके यांच्या जामीनावर आलेल्या कोर्टाच्या निकालावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सत्याचा नेहमीच विजय होतो असे म्हटलं आहे.