शिंदे गटच्या अलर्ट मोडसह इतर बातम्यांसाठी, पहा 4 मिनिट 24 हेडलाईन्समध्ये

शिंदे गटच्या अलर्ट मोडसह इतर बातम्यांसाठी, पहा 4 मिनिट 24 हेडलाईन्समध्ये

| Updated on: Oct 10, 2022 | 5:56 PM

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी देखिल उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. तसेच ठाकरे यांच्याकडून काही चुका झाल्या असतील. मात्र एखादी चुक एवढी मोठी असेल ज्यामुळे पक्षच संपून जावा असेही ते म्हणाले.

राज्यात सत्ता संघर्षानंतर आता शिवसेनेत आणि शिंदे गटात पुन्हा एकदा संघर्ष पहायला मिळत आहे.य निवडणूक चिन्हावरून शिंदे गटाकडून शिवसेनेची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. याच दरम्यान निवडणूक आयोगाने शिवसेनेचं निवडणूक चिन्ह गोठवण्यात आलं आहे. तर शिवसेना हे नाव वापरण्यास देखिल बंदी घातली आहे. त्यावर उद्धव ठाकरे गटाकडून दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. तर या याचिकेवर उद्या सुनावणी होणार आहे. याचदरम्यान शिंदे गटही अलर्ट मोडवर आला आहे. तसेच ठाण्यात निवृत्त न्यायाधिश आणि वकील यांची बैठक ही बोलवण्यात आल्याची सुत्रांकडून माहिती मिळत आहे. पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी तुरंगात असलेले खासदार संजय राऊत यांनी गोठलेल्या चिन्हावर आपली प्रतिक्रीया दिली आहे. त्यांनी नवं चिन्ह हे सेनेसाठी क्रांतिकारक ठरेल असे म्हटलं आहे. तर उद्धव ठाकरे याचं राजकीय रडघाणं असल्याची टीका उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केली आहे. तसेच उद्धव ठाकरेंनी फक्त वेळकाढूपणा केला असेही फडणवीस म्हणाले. याचवेळी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी देखिल उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. तसेच ठाकरे यांच्याकडून काही चुका झाल्या असतील. मात्र एखादी चुक एवढी मोठी असेल ज्यामुळे पक्षच संपून जावा असेही ते म्हणाले. तर सपाचे संस्थापक अध्यक्ष मुलायम सिंह यादव यांच उपचारादरम्यान निधन. यावर पंतप्रधान मोदी, शरद पवार आणि अन्य राजकीय नेत्यांकडून श्रद्धांजली अर्पण.

Published on: Oct 10, 2022 05:56 PM