अंधेरी पोटनिवडणुकासाठी अचारसंहिता लागू झाली आहे. 3 नोव्हेंबरला मतदान, यासह पहा इतर बातम्या 4 मिनिट 24 हेडलाईन्समध्ये
ठाकरे गट आणि शिंदे गटाने निवडणूक आयोगाला दिलेल्या पर्यायात त्रिशूळ आणि उगवत्या सुर्याचा पर्याय सारखेच आहेत. त्यामुळे आता निवडणूक आयोग कोणता निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राज्यात सध्या ठाकरे विरूद्ध शिंदे गट आमने सामने आले आहेत. तर निवडणूक आयोगाने धनुष्यबाण चिन्ह गोठवल्याने ठाकरे गट दिल्ली उच्च न्यायालयात गेला आहे. तर ठाकरे गट आणि शिंदे गटाने निवडणूक आयोगाला दिलेल्या पर्यायात त्रिशूळ आणि उगवत्या सुर्याचा पर्याय सारखेच आहेत. त्यामुळे आता निवडणूक आयोग कोणता निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर ठाकरे गटाला मशाल मिळण्याची शक्यता आहे. तर शिंदे गटाला गदा हे चिन्ह मिळू शकते. उद्धव ठाकरे याचं राजकीय रडघाणं असल्याची टीका उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केली आहे. तसेच उद्धव ठाकरेंनी फक्त वेळकाढूपणा केला असेही फडणवीस म्हणाले. शिंदे गटाने निवडणूक आयोगाला पक्षाच्या नावाचे 3 पर्याय दिले आहे. शिवसेना बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना बाळासाहेबांची आणि बाळासाहेवांची शिवसेना अशा नावांचे पर्याय आयोगाला शिंदे गटाने दिले आहेत. दरम्यान खासदार संजय राऊत यांनी गोठलेल्या चिन्हावर आपली प्रतिक्रीया दिली आहे. त्यांनी नवं चिन्ह हे सेनेसाठी क्रांतिकारक ठरेल असे म्हटलं आहे. तर अंधेरी पोटनिवडणुकासाठी अचारसंहिता लागू झाली आहे. 3 नोव्हेंबरला मतदान होणार आहे.