ठाकरे आणि शिंदे गटाला मिळालं गटाला नवं नाव, पहा कोणतं आहे नाव आणि चिन्ह, या अपडेट सह पहा 4 मिनिट 24 हेडलाईन्स
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना गटाला मशाल हे चिन्ह मिळालं आहे. त्यामुळे अंधेरी पोटनिवडणूक ही नव्या चिन्हानं लढवणार असल्याचे उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून नक्की. तर चिन्हानंतर नावाचा पेच ही निवडणूक आयोगाने सोडवला आहे. ठाकरे यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव देण्यात आलं आहे.
अंधेरी पोटनिवडणुकीच्या आधी उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाला कोणतं चिन्ह मिळणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. त्यावर निवडणूक आयोगाने आपला निर्णय जाहिर केला आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना गटाला मशाल हे चिन्ह मिळालं आहे. त्यामुळे अंधेरी पोटनिवडणूक ही नव्या चिन्हानं लढवणार असल्याचे उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून नक्की. तर चिन्हानंतर नावाचा पेच ही निवडणूक आयोगाने सोडवला आहे. ठाकरे यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव देण्यात आलं आहे. हे तात्पूरतं नाव निवडणूक आयोगाने दिलं आहे. तर शिंदे गटाने बाळासाहेबांची शिवसेना या नावाचा पर्याय दिला होता. त्याप्रमाणे त्यांना बाळासाहेबांची शिवसेना हे नाव देण्यात आलं आहे. तर तीन चिन्हांचा पर्याय ही देण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने शिंदे गटाला दिले आहेत. तर खासदार अरविंद सावंत यांनी शिंदे गटाला टोला लगावला आहे. त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या नावातच सगळं आल्याचे त्यांनी म्हटलं आहे. तर शिंदेच्या बाळासाहेबांची शिवसेना या नावाच्या पुढे ठाकरे नसल्याचेही त्यांनी म्हटलं आहे. तर अनिल परब यांनी आमच्या मशालीत विरोधकांना जाळण्याची ताकद असल्याचे म्हटलं आहे.