बोगस प्रतित्रापत्र प्रकरणी मुंबई क्राईम ब्रांचची टीम कोठे कोठे पोहचली, या अपडेटसह पहा 4 मिनिट 24 हेडलाईन्स

बोगस प्रतित्रापत्र प्रकरणी मुंबई क्राईम ब्रांचची टीम कोठे कोठे पोहचली, या अपडेटसह पहा 4 मिनिट 24 हेडलाईन्स

| Updated on: Oct 12, 2022 | 7:55 PM

दुष्मानांपुढे झुकता येत नाही. पक्षासाठी लढावेच लागेल. आई, मी नक्कीच परत येईन असं भावनीक पत्र खासदार संयज राऊत यांनी त्यांच्या आईला पत्र लिहत म्हटलं आहे.

अंधेरी पोटनिवडणूकीत नवा ट्वीस्ट येण्याची शक्यता आहे. ऋतूजा लटके यांचा राजीनामा लटकला असल्याने उद्धव ठाकरे यांच्यासमोर आता नवे आव्हान उभे झाले आहे. तर लटके यांचा राजीनामा न स्वीकारल्यास ठाकरे गटाचा प्लॅन बी तयार आहे. लटके यांच्या ऐवजी कमलेश राय किंवा उप विभाग संघटक प्रमोद सावंत यांची नाव म्हणून चर्चेत. याच दरम्यान राजीनामा देऊनही तो स्वीकारला गेला नसल्याने ठाकरे गट मुंबई उच्च न्यायालयात गेला आहे. तर याप्रकरणी उद्या सुनावणी होणार आहे. तर मनपा आयुक्तांवर दबाव असल्यानेच त्यांचा राजीनामा स्वीकारला गेला नाही असा आरोप अनिल परब यांनी केला आहे. तर आमची निष्ठा उद्धव ठाकरे यांच्या बरोबर असल्याचे मत ऋतूजा लटके यांनी व्यक्त केलं आहे. तर मशाल या चिन्हावरच ही पोटनिवडणूक लढवणार असा दावा देखिल लटके यांनी केला आहे. तर उद्धव ठाकरे यांनी शिंदेंसह भाजपवर निशाणा साधला आहे. त्यांनी पक्ष आणि चिन्ह गोठवणाऱ्यांना राजकारणात गाडणार असे म्हटले आहे. तर दुष्मानांपुढे झुकता येत नाही. पक्षासाठी लढावेच लागेल. आई, मी नक्कीच परत येईन असं भावनीक पत्र खासदार संयज राऊत यांनी त्यांच्या आईला पत्र लिहत म्हटलं आहे. तर उद्धव ठाकरे यांना देण्यात आलेल्या बोगस प्रतित्रापत्र प्रकरणी मुंबई क्राईम ब्रांचची टीम कोल्हापूरसह शिर्डीत दाखल दाखल झाली. तर बोगस प्रतिज्ञापत्र न्यायालयात दाखल केल्याचा आरोप शिंदे गटाने ठाकरे गटावर केला आहे.

Published on: Oct 12, 2022 07:55 PM