ठाकरेंची साथ सोडण्यासाठी धमक्या देण्यात आल्याचे राऊत म्हणाले, यासह इतर अपडेट घेण्यासाठी पहा 4 मिनिट 24 हेडलाईन्स
गन पॉईंटवर ठेवून माझ्याविरोधात बोगस स्टेटमेंट घेतल्याचे संयज राऊत यांनी म्हटलं आहे. त्यांनी हा खुलासा आईला लिहलेल्या पत्रातून केला आहे. तसेच ठाकरेंची साथ सोडण्यासाठीही धमक्या मिळाल्याचे ही या पत्रात राऊतांनी लिहलं आहे.
अंधेरी पोटनिवडणूकीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा राजीनामा लटकला. मनपाच्या कर्मचारी पदाचा दिली होता राजीनामा. मात्र त्यांचा राजीनामा पालिका आयुक्तांनी स्वीकारलेला नाही. तर लटकेंचा राजीनामा लटकल्याने ठाकरेंच्या अडचणी वाढल्या आहेत. अंधेरी पोटनिवडणूक आधीच ऋतुजा लटके यांच्यावरून पेच निर्माण झाल्याने ठाकरे गटाचा प्लॅन बी तयार आहे. लटके यांच्या ऐवजी कमलेश राय किंवा उप विभाग संघटक प्रमोद सावंत यांची नाव म्हणून चर्चेत. दरम्यान ऋतुजा लटके राजीनामा प्रकरणी ठाकरे गटाने हायकोर्टात धाव घेतली आहे. तर यावर उद्या सुनावणी होईल. तर आयुक्तांवर दबाव असल्यानेच त्यांनी तो स्वीकारला नाही असा आरोप अनिल परब यांनी केला आहे. तर उद्धव ठाकरे यांनी भाजपसह शिंदे गटावर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. यावेळी ठाकरे यांनी पक्ष आणि चिन्ह गोठविणाऱ्यांना राजकारणात गाडणार असे म्हटलं आहे. तर गन पॉईंटवर ठेवून माझ्याविरोधात बोगस स्टेटमेंट घेतल्याचे संयज राऊत यांनी म्हटलं आहे. त्यांनी हा खुलासा आईला लिहलेल्या पत्रातून केला आहे. तसेच ठाकरेंची साथ सोडण्यासाठीही धमक्या मिळाल्याचे ही या पत्रात राऊतांनी लिहलं आहे.