अंधेरी पोटनिवडणुकीत काय होणार ऋतुजा लटके? महानगर पालिका प्रशासन राजीनामा स्विकारणार का? पहा यासह इतर बातम्या 4 मिनिट 24 हेडलाईन्स
अंधेरी पोटनिवडणुकीवरून आज भाजप आणि शिंदे गटाच्या बाळासाहेबांची शिवसेना यांच्यात बैठक. याच बैठकीत उमेदवारीवर चर्चा केली जाणार असल्याची केशव उपाधे यांनी माहिती दिली आहे.
अंधेरी पोटनिवडणुकीवरून उद्धव ठाकरे आणि शिंदे गट सक्रीय झाला आहे. तर ऋतुजा लटके यांच्या राजीनाम्यावरून ठाकरे आणि शिंदे गटात जोरदार वाक युद्ध रंगलं आहे. यादरम्यान ऋतुजा लटके यांच्या राजीनाम्यावरून ठाकरे गट उच्च न्यायालयात गेलं आहे. त्यावर आज सुनावणी आहे. याचवेळी पालिकेचे वकील अनिल साखरे यांनी युक्तिवाद करताना, ऋतुजा लटकेंवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. तर राजकीय दबावापोटीच ऋतुजा लटकेंचा राजीनामा नामंजूर करण्यात आल्याचा दावा लटकेंच्या वकीलांनी उच्च न्यायालयात केला आहे. तर अंधेरी पोटनिवडणुकीवरून आज भाजप आणि शिंदे गटाच्या बाळासाहेबांची शिवसेना यांच्यात बैठक. याच बैठकीत उमेदवारीवर चर्चा केली जाणार असल्याची केशव उपाधे यांनी माहिती दिली आहे. तर शिंदे गटाच्या बाळासाहेबांची शिवसेनाचे नेते नरेश म्हस्के यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. तर उद्धव ठाकरे यांच्याकडून जनतेची फसवणूकीचा प्रयत्न केला जात असल्याचे त्यांनी पत्रात म्हटलं आहे. हे पत्र त्यांनी निवडणूक आयोगाला लिहलं आहे.