सध्या सहानुभूती मिळत आहे. मात्र त्याचा फायदा उद्धव ठाकरे यांनी होणार नाही, असं कोण म्हणालं? पहा 4 मिनिट 24 हेडलाईन्स
नवे चिन्ह मशाल ही अन्याय, गद्दारीला जाळणारी असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. ते सांताक्रुझ येथून मशाल घेऊन आलेल्या कार्यकर्त्यांना संबोधत होते.
उद्धव ठाकरे पाठोपाठ एकनाथ शिंदे यांना निवडणूक आयोगाकडून ढाल तलवार हे चिन्ह मिळालं आहे. तर मशाल विरोधात ढाल तलवार असा सामना पहायला मिळणार. तर मशालिला ढालीचे आव्हाण ही पहायला मिळणार. तर नवे चिन्ह मशाल ही अन्याय, गद्दारीला जाळणारी असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. ते सांताक्रुझ येथून मशाल घेऊन आलेल्या कार्यकर्त्यांना संबोधत होते. दरम्यान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर मशालीवरून टीकास्र सोडलं आहे. तसेच मुख्यमंत्री असताना लोकांच्या घराला मशालीच लावल्या. तर मशालींचा वापर हा घरांना उद्धवस्त करण्यासाठी नका असा सल्लाही त्यांनी दिला आहे. शिवसेना आणि धनुष्यबाण यांच्यावरून मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पहिल्यांदाच आपली प्रतिक्रीया दिली आहे. यावेळी राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या बाजूने सहानुभूती मिळत आहे. मात्र त्याचा फायदा त्यांना होणार नसल्याचे म्हटलं आहे. याच वेळी मनसे मुंबई महापालिका निवडणूक ही स्वबळावर लढवणार. तर विजय ही मिळवू असे राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.