आईला लिहलेल्या पत्रात राऊत काय म्हणाले, यासह पहा इतर बातम्या 4 मिनिट 24 हेडलाईनमध्ये
ऋतुजा लटके यांनी आमची निष्ठा ही उद्धव ठाकरे यांच्यासोबत असल्याचे म्हणत शिंदे गटात जाण्याच्या अफवांना पूर्णविराम दिला आहे.
अंधेरी पोटनिवडणूक ही युती म्हणूनच लढवणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. तर उमेदवार हा शिंदे गटाचा असेल की भाजपचा हे ही लवकरच ठरवू असेही फडणवीस यांनी म्हटलं आहे. तर अंधेरी पोटनिवडणूकीतील ठाकरे गटाच्या उमेदवार लटकें यांना शिंदे गटाकडून मंत्रिपदाचं आमिष दाखवलं जात असल्याचा आरोप अनिल परब यांनी केला आहेत. तर कोणत्याही अमिषासा लटके बळी पडणार नाहीत असा किशोरी पेडणेकर यांचा हल्ला बोल. लटकेंच्या राजीनाम्यावरून ठाकरे गट हायकोर्टात गेला आहे. त्यावर उद्याच सुनावणी होण्याची शक्यता. याचदरम्यान ऋतुजा लटके यांनी आमची निष्ठा ही उद्धव ठाकरे यांच्यासोबत असल्याचे म्हणत शिंदे गटात जाण्याच्या अफवांना पूर्णविराम दिला आहे. दरम्यान पक्ष आणि चिन्ह गोठवणाऱ्यांना राजकारणात गाडणार असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी केला आहे. तर पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी तुरंगात असलेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आईला लिहलेल्या पत्रात मोठा खुलासा केला आहे. तर गन पॉईंटवर ठेवून माझ्याविरूद्ध बोगस स्टेटमेंट घेतल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.