महात्मा गांधी यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य करणं भोवलं, संभाजी भिडे यांच्यावर विरोधात सुनावणी सुरू
अमरावती येथील एका कार्यक्रमात महात्मा गांधी, शिर्डीचे साईबाबा आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यावरून राज्यात जागोजागी आंदोलने झाली होती.
मुंबई, 07 ऑगस्ट, 2023 | शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे यांनी अमरावती येथील एका कार्यक्रमात महात्मा गांधी, शिर्डीचे साईबाबा आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यावरून राज्यात जागोजागी आंदोलने झाली होती. तर यावरूनच संभाजी भिडे यांच्याविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. ही याचिका कुमार महर्षी यांनी दाखल केली होती. त्यावर आता मुंबई हायकोर्टात सुनावणी सुरू झाली आहे. ज्यामुळे भिडे यांच्या अडणचीत वाढ झाल्याचे समोर येत आहे. तर भिडे यांच्याविरोधात याच्याआधीच अमरावती गुन्हा दाखल करण्यात आला असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापुरूषांचा अवमान करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन विधानसभेमध्ये दिले होते.
Published on: Aug 07, 2023 01:08 PM
Latest Videos