थांबा कल्याण स्टेशनला जाताय? तुमच्याकडे आहे का? पाण्यानं भरलेली बॉटल, अन्यथा…
उन्हाचा तडाखा वाढल्याने काळजी घ्या असे प्रशासनासह अरोग्य विभागाकडून सांगण्यात येत आहे. याचदरम्यान राज्याच्या अनेक भागात उष्णतेची लाट आली आहे.
कल्याण : राज्यात उष्णतेचा पारा चढत आहे. अनेक ठिकाणी उष्णा घातासारखे प्रकरणं समोर येत आहेत. तर उन्हाचा तडाखा वाढल्याने काळजी घ्या असे प्रशासनासह अरोग्य विभागाकडून सांगण्यात येत आहे. याचदरम्यान राज्याच्या अनेक भागात उष्णतेची लाट आली आहे. मुंबईसह परिसरातील पारा देखील वर चढताना दिसत आहे. त्यातच आता रेल्वे स्थानकांमध्ये प्रवाशांना थंडगार पाणी मिळत नसल्याचे समोर आले आहे. कल्याण स्थानकांमध्ये प्रवाशांना थंडगार पाणी उपलब्ध व्हावे यासाठी मध्य रेल्वेने मोठा गाजावाजा करत जनजल योजना सुरू केली होती. मात्र ती सुरू केलेली जनजल योजना बंद पडली आहे. त्यामुळे कल्याण स्टेशनवर सस्त दरात मिळणारे रेल नीर पाण्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रवाश्यांना जादा पैसे खर्च करून महागड्या पाण्याच्या बाटल्या विकत घ्याव्या लागत आहेत. ज्यामुळे रेल्वेत प्रवाशांचे हाल, होताना दिसत आहे. तर दुकानदार मात्र मालामाल होत आहेत.