विदर्भात उष्णतेची लाट; उच्चांकी तापमानाची नोंद

विदर्भात उष्णतेची लाट; उच्चांकी तापमानाची नोंद

| Updated on: Jun 04, 2022 | 9:25 AM

वातावरणात झालेल्या बदलांमुळे विदर्भात पुन्हा एकदा उष्णतेची लाट आली आहे. उच्चांकी तापमानाची नोंद झाली असून, पुढील दोन दिवस उष्णतेचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

राज्यात मान्सूनचे आगमन लांबणीवर पडले आहे. मोसमी वाऱ्यांच्या महाराष्ट्र प्रवेशात अडथळा निर्माण झाला आहे. गेल्या तीन दिवसांपासून मोसमी पाऊस कर्नाटकमधील कारवामध्येच अडकला आहे. दरम्यान दुसरीकडे वातावरणात झालेल्या या बदलामुळे विदर्भात पुन्हा एकदा उष्णतेची लाट आली आहे. विदर्भात उच्चांकी तापमानाची नोंद झाली असून, पुढील दोन दिवस उष्णतेचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.