महाराष्ट्रभरात पावसाची जोरदार बॅटिंग, कुठे भुस्खलन, तर कुठे साचलं पाणी, पाहा स्पेशल रिपोर्ट...

महाराष्ट्रभरात पावसाची जोरदार बॅटिंग, कुठे भुस्खलन, तर कुठे साचलं पाणी, पाहा स्पेशल रिपोर्ट…

| Updated on: Jun 29, 2023 | 9:29 AM

गेल्या आठवड्याभरापासून मुंबईसह राज्यभरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मुंबई, कोकणासह विदर्भातही पावसाचं आगमन झालं आहे. या पावसामुळं सखल भागात पाणी साचलं आहे. यामुळं काही ठिकाणी वाहतुकीवर परिणाम झाल्याचं चित्र दिसत आहे.

महाराष्ट्र: गेल्या आठवड्याभरापासून मुंबईसह राज्यभरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मुंबई, कोकणासह विदर्भातही पावसाचं आगमन झालं आहे. या पावसामुळं सखल भागात पाणी साचलं आहे. यामुळं काही ठिकाणी वाहतुकीवर परिणाम झाल्याचं चित्र दिसत आहे. मुंबई-अहमदाबाद महामार्गावर पाणी साचल्यामुळे वाहतुक काही काळ ठप्प करण्यात आली होती. मुंबईतील वांद्रे, दादर आणि ठाणे परिसरात हलक्या पावसाने हजेरी लावली आहे. रत्नागिरीच्या गणपतीपुळ्यात रस्त्यावर पाणी साचलं.तर काजळी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. तसेच रायगडच्या आंबेनळी घाटात दरळ कोसळ्यामुळे वाहतूक बंद करण्यात आली. मुसळधार पावसामुळे कोल्हापुरातील विशाळगडाचा बुरुज कोसळला. पावसामुळे आणखी कुठे नुकसान झाले यासाठी पाहा हा स्पेशल रिपोर्ट…

 

Published on: Jun 29, 2023 09:29 AM