....आता वाघाचे पांघरून बसलेत; शिवसेना नेत्याचा ठाकरे गटावर पलवार

….आता वाघाचे पांघरून बसलेत; शिवसेना नेत्याचा ठाकरे गटावर पलवार

| Updated on: Apr 13, 2023 | 11:21 AM

गायकवाड यांनी टीका करणाऱ्या खासदार संजय राऊत, अरविंद सावंत विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांचा समाचार घेतला आहे. त्यांनी यांच्यावर सडकून टीका करताना, महाराष्ट्रातले खरे वाघ कोण आहेत, हे महाराष्ट्रातील जनतेला ठाऊक आहे असं म्हटलं आहे.

बुलढाणा : राज्यात अनेक ठिकाणी अकवाळी पाऊस आणि गारपीट झाली. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्रीमंडळ, त्यांचे आमदार, खासदार हे अयोध्या दौऱ्यावर होते. यावून विरोधकांसह ठाकरे गटातील नेत्यांनी शिंदे गटाच्या शिवसेनेवर टीका केली होती. त्यावरून बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी ठाकरे गटाला जशाच तस उत्तर दिल आहे. त्याचबरोबर गायकवाड यांनी टीका करणाऱ्या खासदार संजय राऊत, अरविंद सावंत विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांचा समाचार घेतला आहे. त्यांनी यांच्यावर सडकून टीका करताना, महाराष्ट्रातले खरे वाघ कोण आहेत, कोल्हे, कुत्रे, लांडगे कोण आहेत, हे महाराष्ट्रातील जनतेला ठाऊक आहे. खऱ्या अर्थाने ज्यांचा शिवसेनेशी संबंध आला नाही, तेच लोक आता वाघाचे पांघरून बसलेत असा घणाघात केला आहे.

Published on: Apr 13, 2023 11:21 AM