Mumbai Rain : मुंबईत वीकेंडची सुरुवात मुसळधार पावसाने, पाणी साचल्यानं अंधेरी सबवे बंद
मुंबई आणि उपनगरातील अनेक भागांमध्ये पहाटेपासून विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे सखल भागांमध्य पाणी साचायला सुरुवात झाली आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास मुंबई पुन्हा एकदा ठप्प होण्याची शक्यता आहे. | Mumbai Rain
मुंबई आणि उपनगरातील अनेक भागांमध्ये पहाटेपासून विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे सखल भागांमध्य पाणी साचायला सुरुवात झाली आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास मुंबई पुन्हा एकदा ठप्प होण्याची शक्यता आहे.
गेल्या तीन दिवसांपासून मुंबईत आणि उपनगर परिसरात बरसत असलेल्या पावसाचा जोर आणखीन वाढण्याची शक्यता हवामान खात्याने (IMD) वर्तविली आहे. हवामान खात्याने मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. येत्या चार तासांमध्ये याठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार स्वरुपाचा पाऊस (Rain) बरसण्याची शक्यता आहे.
Published on: Jun 12, 2021 08:28 AM
Latest Videos