Ratnagiri Breaking | रत्नागिरी, लांजा, संगमेश्वरमध्ये तुफान पाऊस, दिवसभर पावसाचा जोर राहण्याचा अंदाज
चिपळूण शहरात पावसाने विश्रांती घेतली आहे
रत्नागिरी- दक्षिण रत्नागिरीत सलग चौथ्या दिवशी पाऊसधारा कायम आहे. चिपळूणात पावसाची विश्रांती, मात्र रत्नागिरी, लांजा संगमेश्वरात तुफान पाऊस, आज देखील पावसाचा अलर्ट, समुद्र देखिल खवळलेला आहे. जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशी कोसळधार, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. दक्षिण रत्नागिरीतील अनेक नद्या दुथडीभरून, दिवसभर पावसाचा जोर राहण्याचा अंदाज आहे. रत्नागिरी खेड तालुक्यातील रघुवीर घाटात मुसळधार पावसामुळे कोसळली मोठी दरड कोसळली आहे. 12 तासाहून अधिक रघुवीर घाट बंद होता. रघुवीर घाटात दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प आहे. रत्नागिरी जिल्हा आणि सातारा या दोन जिल्ह्यांना रघुवीर घाट जोडतो. घाटात मोठी दरड कोसळल्याची 15 दिवसातील 3 री घटना समोर घाट सुरू करण्याचे युद्धपातळीवरती प्रयत्न सुरू आहेत.
Published on: Aug 08, 2022 09:51 AM
Latest Videos