कोल्हापुरकरांची चिंता वाढली; जिल्ह्यासाठी पुढील पाच दिवस महत्वाचे! पंचगंगेच्या पाणी पातळीत मोठी वाढ!

कोल्हापुरकरांची चिंता वाढली; जिल्ह्यासाठी पुढील पाच दिवस महत्वाचे! पंचगंगेच्या पाणी पातळीत मोठी वाढ!

| Updated on: Jul 23, 2023 | 8:51 AM

गेल्या काही दिवसापासून कोल्हापुरमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. कृष्णा आणि पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. इचलकरंजी शहरातील पंचगंगा नदीची पाणी पातळी सध्या 61 फुटांवर आहे.

कोल्हापुर, 3 जुलै 2023 : गेल्या काही दिवसापासून कोल्हापुरमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. कृष्णा आणि पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. इचलकरंजी शहरातील पंचगंगा नदीची पाणी पातळी सध्या 61 फुटांवर आहे तर इशारा पातळी 68 तर धोका पातळी 71 फुटांवर आहे. नदी काठावरील असणारे गणपती मंदिर महादेव मंदिर आि इतर मंदिर पाण्याखाली गेले. इचलकरंजी महानगरपालिकेच्यावतीने आपत्ती व्यवस्थापन यांच्याकडून एक यांत्रिक बोट, 10 जवान असे तैनात करण्यात आले आहेत. कर्नाटक आणि इचलकरंजीला जोडणारा लहान पूल पाण्याखाली गेला आहे. हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. पावसाचा जोर वाढला तर नागरी वस्त्यांमध्ये पुराचे पाणी घुसण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. तर कोल्हापूर जिल्ह्यातील 40 बंधारे पाण्याखाली गेले आहेत.

Published on: Jul 23, 2023 08:51 AM