भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द धरणातून विसर्ग वाढवला; नागरिकांना प्रशासनाचं काय आवाहन?
VIDEO | गोसीखुर्द धरणातून पाण्याचा 1,87, 204 क्युसेस पाण्याचा विसर्ग वाढविला, नदी काठांवरील नागरिकांना प्रशासनानं काय केलं आवाहन?
भंडारा, 5 ऑगस्ट 2023 | भंडारा जिल्ह्यातील वैनगंगा नदीवरील गोसीखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मागील तीन दिवस जोरदार पाऊस पडला. यासह धापेवाडा बॅरेजमधून सोडण्यात येणारं पाणी यामुळं गोसीखुर्द धरणाच्या जलसाठ्यातही मोठी वाढ झाली आहे. परिणामी गोसीखुर्द धरणाची पाण्याची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी आता धरणाचे सर्व 33 गेट उघडण्यात आले असून त्यातून 1 लाख 87 हजार 204 क्युसेस पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. धरण प्रशासनानं यासाठी 15 गेट 1 मीटरनं तर, 18 गेट अर्धा मिटरनं उघडले आहेत. गोसीखुर्द धरणातून विसर्ग करण्यात येणाऱ्या पाण्याचा फटका चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांना बसतो तर मध्यप्रदेशातील संजय सरोवर व गोदिया जिल्ह्यातील धापेवाडा येथील धरणा मधून मोठया प्रमाणात पाणी विसर्ग होत असल्याने गोसेखुर्द धरणातीचे 33 ही दरवाजे पुढील काही तासात 1 मिटरनं सुरू करण्यात येणार असल्याची माहिती धरण प्रशासनानं दिली आहे. त्यामुळं नदी काठांवरील नागरिकांनी सतर्क राहावं, असं आवाहन धरण प्रशासनानं केलं आहे.