Sindhudurg | सिंधुदुर्गातल्या वेंगुर्लामध्ये मुसळधार पाऊस
वाहन चालकांबरोबर प्रवाशांचे देखील मोठे हाल होत आहेत. बहादूर शेख नाका या ठिकाणी प्रवाशी बस थांबल्या आहेत. प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. मुंबई गोवा महामार्ग पूर्ण ठप्प झाला आहे.
वेंगुर्ला तालुक्यात गेले दोन दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे पाण्याच्या पातळीत मोठी वाढ पाहायला मिळाली. यामुळे ठिकठिकाणी नदी ओहोळांच्या पाणी रस्त्यावर येऊन काहिठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे तर रस्त्यावर आंब्याचे झाड पडून वाहतूक काहीकाळ ठप्प झाली होती.परशुराम घाटात दरड कोसळली यामूळ घाट मार्ग बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. यामुळं वाहनांच्या रांगाच रांगा चिपळूण मधील हायवेवर पाहायला मिळत आहेत. वाहन चालकांबरोबर प्रवाशांचे देखील मोठे हाल होत आहेत. बहादूर शेख नाका या ठिकाणी प्रवाशी बस थांबल्या आहेत. प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. मुंबई गोवा महामार्ग पूर्ण ठप्प झाला आहे.
मागील 24 तासात जिल्ह्यात सरासरी 150.47 मिमी पावसाची नोंद.या मोसमातला हा सर्वात मोठा पाऊस. काल सकाळ पासून मुसळधार पाऊस जिल्ह्यात कोसळला.अनेक नदी नाले पात्र सोडून वाहत होते.अनेक रस्ते पाण्याखाली गेले होते.या मुसळधार पावसाने सिंधुदुर्गवासीयांचे जनजीवन विस्कळीत केले होते.मात्र काल सायंकाळ नंतर पावसाचा जोर ओसरला.आज सकाळ पासून हलका हलका पाऊस मध्येच एखादी दमदार सर .