सध्या देशासह राज्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी राजकीय नेत्यांचे जिल्ह्यात दौऱे सुरू आहे. दरम्यान, प्रचारासाठी राज्यभरात सुषमा अंधारे फिरत असून त्यांची काल कोकणात सभा होती. त्यानंतर आज ते बारामतीकडे रवाना होणार होत्या. यासाठी त्यांना घेण्यासाठी महाडमध्ये हेलिकॉप्टर आले होते. परंतु सुषमा अंधारे यांना घेण्यासाठी आलेलं हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याची माहिती समोर आली आहे. सुदैवाने सुषमा अंधारे या हेलिकॉप्टरमध्ये बसण्यापूर्वी हा अपघात झाला. पंरतु सुषमा अंधारेंनी आपण सुखरूप असल्याचे म्हटलं आहे. तर पायलेटही सुखरुप आहे. सुषमा अंधारे सकाळी 9.30 वाजता महाडमधून बारामतीकडे हेलिकॉप्टरने रवाना होणार होत्या. त्यासाठी त्या हेलिपॅडवर दाखल झाल्या होत्या. परंतु त्यापूर्वी हा अपघात झाला. तर तांत्रिक बिघाडामुळे हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याचे सांगण्यात येत आहे.