बाळासाहेब ठाकरेंचा वारसा राज ठाकरेंकडे...

बाळासाहेब ठाकरेंचा वारसा राज ठाकरेंकडे…

| Updated on: Aug 24, 2022 | 11:34 AM

हिंदुत्त्वाच्या मुद्यावर ज्याप्रमाणे राज ठाकरे आपली भूमिका मांडत आहेत, तो खरा वारसा बाळासाहेब ठाकरे यांचाच असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्या प्रमाणे हिंदुत्त्वाच्या मुद्यावरुन बंडखोरी करून महाविकास आघाडीतून बाहेर पडले त्याच प्रमाणे हिंदुत्त्वाचा मुद्दा जोरदारपणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेही मांडत आहेत. बाळासाहेब ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्याकडे जेव्हा युवासेनेची जबाबदारी दिली होती, त्यावेळी राज ठाकरे यांनी ती जबाबदारी समर्थपणे हाताळली होती, त्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्त्वाचा विचाार आणि वारसा राज ठाकरेही चालवत आहेत असं मत मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केले. हिंदुत्त्वाचा मुद्दा घेऊनच आम्ही महाविकास आघाडीतून बाहेर पडलो आहे आणि तोच वारसा आम्ही पुढे चालवत आहोत असंही त्यांनी यावेळी सांगितले. हिंदुत्त्वाच्या मुद्यावर ज्याप्रमाणे राज ठाकरे आपली भूमिका मांडत आहेत, तो खरा वारसा बाळासाहेब ठाकरे यांचाच असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.