हिंदू संघटनांचं आंदोलन...दगडफेक, लाठीचार्ज, कोल्हापुरात नेमकं काय घडलं? पाहा स्पेशल रिपोर्ट!

हिंदू संघटनांचं आंदोलन…दगडफेक, लाठीचार्ज, कोल्हापुरात नेमकं काय घडलं? पाहा स्पेशल रिपोर्ट!

| Updated on: Jun 08, 2023 | 7:35 AM

एका वादग्रस्त, आक्षेपार्ह स्टेटसवरून कोल्हापुरात बुधवारी राडा झाला. कोल्हापुरातील हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत. या हिंदुत्ववादी संघटनांनी जमावबंदीचे आदेश झुगारून हा मोर्चा काढला. यावेळी हजारो लोक मोर्चात सहभागी झाले होते. हा मोर्चा सुरू असतानाच आंदोलकांना पोलिसांनी पांगवण्याचा प्रयत्न केला. मात्र, हिंदुत्ववादी कार्यकर्ते आक्रमक झाल्याने पोलिसांनी अखेर या मोर्चावर लाठीमार केला.

कोल्हापूर : एका वादग्रस्त, आक्षेपार्ह स्टेटसवरून कोल्हापुरात बुधवारी राडा झाला. कोल्हापुरातील हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत. या हिंदुत्ववादी संघटनांनी जमावबंदीचे आदेश झुगारून हा मोर्चा काढला. यावेळी हजारो लोक मोर्चात सहभागी झाले होते. हा मोर्चा सुरू असतानाच आंदोलकांना पोलिसांनी पांगवण्याचा प्रयत्न केला. मात्र, हिंदुत्ववादी कार्यकर्ते आक्रमक झाल्याने पोलिसांनी अखेर या मोर्चावर लाठीमार केला. त्यामुळे आंदोलकांमध्ये एकच आफरातफर माजली. एक आंदोलक तर थेट पोलिसांच्या गाडीवर चढला होता. पोलिसांच्या लाठीमारामुळे एकच गोंधळ उडाला. औरंग्याच्या औलादींना सोडणार नाही, असं फडणवीस म्हणाले. तर विरोधक हे सर्व सत्ताधारी करत असल्याचा आरोप करत आहेत.कोल्हापुरातील आंदोलनाला हिसंक वळण लागलं आहे. नेमकं कोल्हापुरात घडलं काय? यासाठी पाहा या संदर्भातील स्पेशल रिपोर्ट

Published on: Jun 08, 2023 07:35 AM