कोल्हापुरात आक्षेपार्ह स्टेटसचे पडसाद; छत्रपती शिवाजी महाराज चौकात हिंदू संघटना आक्रमक
येथे काही तरुणांनी औरंगजेब याचे आक्षेपार्ह व्हॉट्सअॅप स्टेट्स ठेवले होते. यामुळे तनावाचे वातावरण निर्माण झाले होतं. दरम्यान, या तरूणांवर कारवाईची मागणी करण्यासाठी लक्ष्मीपुरी, शाहूपुरी पोलीस ठाण्यासमोर हिंदुत्ववादी संघटनांनी काल ठिय्या आंदोलन केले होतं.
कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 349 व्या शिवराज्यभिषेक सोहळ्याच्या दिवशीच कोल्हापूर मध्ये एक घटना घटली. ज्यामुळे अख्ख शहर आज बंद करण्यात आलं आहे. येथे काही तरुणांनी औरंगजेब याचे आक्षेपार्ह व्हॉट्सअॅप स्टेट्स ठेवले होते. यामुळे तनावाचे वातावरण निर्माण झाले होतं. दरम्यान, या तरूणांवर कारवाईची मागणी करण्यासाठी लक्ष्मीपुरी, शाहूपुरी पोलीस ठाण्यासमोर हिंदुत्ववादी संघटनांनी काल ठिय्या आंदोलन केले होतं. तर आंदोलनानंतर शहरात काही ठिकाणी दगडफेकीचे प्रकार घडले. पोलिसांनी जमावाला पांगवले होते. मंगळवारी रात्री पर्यंत शहरात तणाव होता. मात्र आज कोल्हापूर बंदची हाक देण्यात आली आहे. तर छत्रपती शिवाजी महाराज चौकात हिंदुत्ववादी संघटना एकत्र आल्या आहेत. तसेच याविरोधात आंदोलन केले जात आहे. यावेळी पोलीस प्रशासनाकडून तगडा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. या आंदोलनात मोठ्या प्रमाणावर मुली आणि महिलांचा समावेश आहे. तर कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नावरून अपर जिल्हादंडाधिकारी भगवान कांबळे यांनी 19 जूनच्या रात्री बारापर्यंत जिल्ह्यात बंदी आदेश लागू केला आहे.