उर्दू बॅनरवरून शिंदे-फडणवीस यांची टीका; 'आता अली जनाब झाले'

उर्दू बॅनरवरून शिंदे-फडणवीस यांची टीका; ‘आता अली जनाब झाले’

| Updated on: Mar 26, 2023 | 9:25 AM

जास्तीत जास्त मुस्लीम बांधवांनी हजर राहवं यासाठी मालेगावच्या चौका-चौकात ठाकरे गटाकडून उर्दू भाषेत जोरदार बॅनरबाजी करण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे

नाशिक : हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून एकीकडे राज्याचं राजकारण ढवळून निघालेलं असताना उद्धव ठाकरे उद्या मालेगावमध्ये जाहीर सभा घेणार आहेत. या सभेला जास्तीत जास्त मुस्लीम बांधवांनी हजर राहवं यासाठी मालेगावच्या चौका-चौकात ठाकरे गटाकडून उर्दू भाषेत जोरदार बॅनरबाजी करण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. सध्या रमजानचा महिना सुरू असल्याने यासभेला जास्तीत जास्त मुस्लीम बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहवं म्हणून विशेष प्रयोजन करण्यात येत असल्याचे मालेगावातील बहुल भागात पाहायला मिळत आहे. मात्र यावेळी ठाकरे यांचे उर्दु पोस्टर लागल्याने त्यांच्यावर आता टीका होत आहे. उद्धव ठाकरे यांच्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टीका करताना ते आता हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे बोलायलाही कचरत असल्याचं म्हटलं आहे. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा उल्लेख अली जनाब असा केला आहे.

Published on: Mar 26, 2023 09:25 AM