गळा दाबण्याचा प्रयत्न, माझी मुलं आणि कार्यकर्ते पोरके झाले असते; प्रज्ञा सातव भावूक
काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी, आमदार प्रज्ञा सातव यांच्यावर काल रात्री जीवघेणा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यानंतर प्रज्ञा सातव यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. पाहा...
हिंगोली : काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी, आमदार प्रज्ञा सातव यांच्यावर काल रात्री जीवघेणा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यानंतर टीव्ही 9 मराठीशी बोलताना त्यांनी या हल्ल्यामागची कहानी सांगितली आहे. तसंच हा हल्ला फक्त माझ्यावर नसून लोकशाहीवरचा हल्ला असल्याचं त्यांनी म्हटलं. शिवाय मी लोकांशी संवाद साधत असताना माझा गळा दाबण्यात आला. जर या हल्ल्यात मला काही झालं असतं तर माझी मुलं पोरकी झाली असती. माझ्या सासूबाईंचा आधार हरपला असता. कार्यकर्ते पोरके झाले असते, असं प्रज्ञा सातव म्हणाल्यात. तसंच माझ्या बॉडीगार्डमुळे माझा जीव वाचला, असंही त्या म्हणाल्या आहेत.
Published on: Feb 09, 2023 08:13 AM
Latest Videos