त्यांच्या तोंडाला पाणी सुटले आणि... अमित शहा यांचा उद्धव ठाकरे यांच्यावर टीका

त्यांच्या तोंडाला पाणी सुटले आणि… अमित शहा यांचा उद्धव ठाकरे यांच्यावर टीका

| Updated on: Feb 19, 2023 | 7:51 PM

२०१९ मध्ये निवडणूक लढली. मोदी यांचा फोटो मोठा होता. उद्धव ठाकरे यांचा फोटो लहान होता. मी आणि मोदी यांनी देवेंद्र हेच मुख्यमंत्री होणार असे म्हणालो होतो.

कोल्हापूर : २०१९ मध्ये निवडणूक लढली. मोदी यांचा फोटो मोठा होता. उद्धव ठाकरे यांचा फोटो लहान होता. मी आणि मोदी यांनी देवेंद्र हेच मुख्यमंत्री होणार असे म्हणालो होतो. निवडणुकीचा परिणाम समोर आला त्यांच्या तोंडाला पाणी सुटले. मुख्यमंत्री पदासाठी सर्व सिद्धांत मोडून टाकत शरद पवार यांच्या चरणी जाऊन बसले. आम्हाला सत्तेचा लोभ नाही. सत्तेसाठी आम्ही सिद्धांताचा बळी दिला नाही. बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष शरद पवार यांच्या चरणी लिन झाला होता अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कोल्हापूर येथील सभेत बोलताना केली. आता तोच पक्ष एकनाथ शिंदे यांच्या हाती येऊन आमच्या भाजपसोबत येऊन बसला आहे असेही ते म्हणाले

Published on: Feb 19, 2023 07:51 PM