Indrajit Sawant | ‘संभाजी महाराजांना एका धर्माचे रक्षक म्हणून पुढे आणणं चुकीचं’: इंद्रजित सावंत
छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर होते. पण त्यांना अभिप्रीत असणारा त्यांचा धर्म हा मराठा धर्म किंवा महाराष्ट्र धर्म होता असेही सावंत यांनी म्हटलं आहे.
छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर नव्हते,’ असे वादग्रस्त वक्तव्य विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी केलं होतं. त्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले. तसेच त्यांच्या या वक्तव्याचा अनेकांनी विरोध केला. त्यांच्याविरोधात निदर्शने देखिल करण्यात आली. तर पवार यांच्या त्याच विधानावरून स्वराज्य संघटनेचे प्रमुख माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनीही नाराजी व्यक्त करत विरोध दर्शवला. यावर आता इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनी देखिल प्रतिक्रीया दिली आहे.
इंद्रजीत सावंत यांनी यावेळी छत्रपती संभाजी महाराज यांना एका धर्माचे रक्षक म्हणून समोर आणलं जात आहे. आणि हे करणं चुकीचं असल्याचंही सावंत यांनी म्हटलं आहे.
त्याचबरोबर छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर होते. पण त्यांना अभिप्रीत असणारा त्यांचा धर्म हा मराठा धर्म किंवा महाराष्ट्र धर्म होता असेही सावंत यांनी म्हटलं आहे.