sushama andhare : शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांची मागणी, जादूटोणा सरकार या घटनांची चौकशी करा
विनायक मेटे यांचा अपघात झाला. त्यावेळी त्यांच्या आई काय बोलल्या हे आपणास माहित आहेच. त्यामुळे या अपघाताची आणि सगळ्याचीच चौकशी झाली पाहिजे
मुंबई : शिंदे सरकार जादूटोण्याचे सरकार आहे. यातील सगळे लोक अंधश्रद्धा यात ढकलले आहेत. शिंदे गटाच्या मनात धाकधूक असल्यामुळेच मंत्रिमंडळ विस्तार पुढे ढकलत आहेत. मात्र, त्यामुळे बाकीच्या उमेदवारांची धुसफूस चव्हाट्यावर येत आहे, अशी टीका शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केली आहे.
मंत्रिमंडळ विस्ताराबद्दल बोलणाऱ्या आमदारांचे अपघात होत आहेत. मंत्रिमंडळाच्या संदर्भाने जो जो कोणी बोलतो त्याचे अपघात होतात. बच्चू भाऊ कडू यांचा अपघात झाला. विनायक मेटे यांचा अपघात झाला. त्यावेळी त्यांच्या आई काय बोलल्या हे आपणास माहित आहेच. त्यामुळे या अपघाताची आणि सगळ्याचीच चौकशी झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली.
Latest Videos